भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया

tujhen dasya karun anika magon khavaya

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥ संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥ तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥