भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा

tujhe pay majhe rahiyele chittin | te maj daviti varma deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ध्रु.॥ मन स्थिर ठेलें इंद्रियें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥ पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥ तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥