भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा

tujha mhanavuni disaton ga din | hachi abhiman sare tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥ तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगां जगदीशा पांडुरंगा ॥३॥