भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो

tujavin vanin anikanchi thori | tari majhi hari jivha jhado

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥ नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥ तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥