भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तू थोंटा

tujashin sambandh khota | parata parata re tu thonta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तू थोंटा ॥१॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥ जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥