भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा

tujalagin majha jiv jhala pisa | avalokiton disha panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु.॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥ प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥ तुका म्हणे आतां कोणता उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥