भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा

tujaaisa koni na dekhen udar | abhayadanashur panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरी आपुलिया ॥३॥ तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥