भजनी मालिका
← भजनांकडे परत

तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा

tu amhan soyara sajjan sangati | tujalagin priti chalo sada

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥ गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥ तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥