भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी

trasala ha jiv sansarinchya sukha | tujavin sakha nahin koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥ ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥ध्रु.॥ कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥ नाहीं पूर्व पुण्य मज पामरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥३॥ अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥