भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार

toduni pushpavatika phalavrukshayati | babhala rakhati karuni sar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥ धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काऱ्हाळे जिरें बीज ॥२॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥ तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥