भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी

thevuni iman rahilon charanin | mhanauni dhani krupa kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥ करूनि सांभाळीं राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥ तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाहीं येथें चित्त देणें ॥३॥