भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं

taruvar bija potin | bij taruvara sevatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥ तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥ उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥ तुका म्हणे बिंबछाया । ठायीं पावली विलया॥३॥