भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा

tarunyachya maden na mani konasi | sada musamusi ghuli jaisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥ हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥ श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥ तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥