भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं

tarun lagalen bandarin | chandrabhagechiye tirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरीनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥