भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें

tarin bhalen vanyan gelon | janma alon maguta | mhanauni thelon das | savakas nirbhayen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥ सांभाळावें तें म्या काईं । अवो आईं विठ्ठले । भोग जया जाईंन स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥ आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका म्हणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥