भजनी मालिका
← भजनांकडे परत

टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें

tanvakaruni drushti lavuniyan rag | davi jhagamag dolyampudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥ दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥ रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥ पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥ नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥ झाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥५॥ पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥६॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥७॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥८॥ विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥९॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१०॥ वैराग्याचा लोप हरीभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥ तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥