भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला

tanv anandala hari paripurna lotala

तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला । मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥ १ ॥ चांगयाचे मुखीं घालीत कवळू । आपण गोपाळु दयासिंधु ॥ २ ॥ दिधलें तें तूं घेई पूर्ण तें होई । सप्रेमाचे डोही संतजन ॥ ३ ॥ नामया विठया नारया लाधलें । गोणाई फावलें अखंडित ॥ ४ ॥ राही रखुमाई कुरवंडी करिती । जिवें वोंवाळिती नामयासी ॥ ५ ॥ निवृत्ति खेंचर ज्ञानदेव हरि । सोपान झडकरी बोलाविला ॥ ६ ॥