भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी

tak ruka chal rande kan ge keli govi | pusoniyan alen thav mhanoni deten sivi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥ कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥ याजसाठीं डौर म्या धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥