भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां

svargiche amar ichchhitati deva | mrutyulokin vhava janma amhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥ नारायणा नामें होऊं जिवनमुक्त । कीर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥ वैकुंठींचे जन सदा इच्छीतात। कइं येथें येती हरीचे दास ॥२॥ यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥ तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥