भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वमुखे चि तुह्मीं सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ

svamukhe chi tuhmin sanga maj seva | aise majhe deva manorath

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वमुखे चि तुह्मीं सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥ निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥ बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥ तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥