भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें

svamitvachin varmen asoni javali | vahon javen moli gunansaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥ धनवंत्र्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥ तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडोव्याची वाट विसरावी ॥३॥