भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें

sukharup aisen kon dujen sanga | majhya panduranga sariken ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥ चंद्रभागे स्नान विध तो हरीकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥