भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाची वसति झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें

sukhachi vasati jhali majhe jivin | tumachya gosavi krupadanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखाची वसति झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥ विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥२॥ तुका म्हणे कांहीं नाठवेसें झाले । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥