भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें

sukhache vyavaharin sukhalabh jala | ananden kondala magen pudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥ समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥२॥ तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥