भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका

sukh nahin kothen aliya sansarin | vanya hanvabhari houn naka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥ चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥ तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरी ॥३॥