भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं

sukh hen navade amhan kona balen | nenasi andhalen jalishi tun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥ भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥ द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥ सोइरे सज्जन जन आणि मन । अवघें समान काय गुणें ॥३॥ तुका म्हणे आम्हां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥