भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च

sukal ha divasarajani | nit dhani navi cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥ करुनि सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥ सरे ऐसा नाहीं झरा। पंक्ती करा समवेत ॥२॥ तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥