भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी

stuti tari karun kay konapasin | kirta tari kaisi vakhanavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥ खोटया तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरी बरा ॥ध्रु.॥ म्हणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥ तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥