भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा

stuti karin jaisa nahin adhikar | na kale vichar yogyatecha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरी मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥ तुका म्हणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥