भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थिर धीर निर सविचारसार

sthir dhir nir savicharasar

स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥ तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा । यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥ कळिकाळ कळिता काळ आकळिता । आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥ निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट । खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥