भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा

sopen varma amhan sangitalen santin | tal dindi hatin gheuni nacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा हें कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥ पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्ती भाग्य बळें निर्भरता ॥२॥ उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरीदासांच्या ॥३॥ तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥