भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव

sopan sanvagada svanand dnyanadev

सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥ दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥ २ ॥ नरहरि विठा नारा ते गोणाई । प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥ ३ ॥ निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलिकसंगे हरि खेळे ॥ ४ ॥