भजनी मालिका
← भजनांकडे परत

शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या

shrugarik majhin navhati uttaren | alaviton khare avasthechya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥ तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥