भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत

shrisantanchiya matha charananvari | sashtang hen karin dandavat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥