भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों

shikavilen tumhin ten rahe tonvari | maj ani hari viyog ton

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥