भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों

sharanagat jhalon | tenen mipana mukalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥ नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥ तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥