भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख

shantiparaten nahin sukh | yer avaghen chi duhkh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥ खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥ म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥