भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांति दया क्षमा तेथील उपाया

shanti daya kshama tethil upaya

रचनाकार: संत सोपान · अभंग
शांति दया क्षमा तेथील उपाया । निर्गुणी ते माया आपरूप ॥१॥ ज्योतीरुप छाया सर्व हे निर्गुण । आत्मारामी भिन्न नाही नाही ।॥२।। मौन्य परे मिठी पश्चंतीसी नुठी । मध्यमेच्या बेटी खुंटे तारू ।।३।। सोपान वैखरी देहामाजी भारी । पुर्ण तो श्रीहरी बिंबी बिंब ॥४॥