भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी

shahaniyan pure ek chi vachan | visharati khun te chi tyasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥ फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥ तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होईल डोळे ॥३॥