भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर

shabda nahin dhir | jyachi buddhi nahin sthir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥ संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥ तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥