भजनी मालिका
← भजनांकडे परत

सौरी सुर झालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती

sauri sur jhalen dur daur ghetala hatin | maya moh sandavalen tihi lokin jhalen sarati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सौरी सुर झालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती ॥१॥ चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥ हिंडोनि चौऱ्यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥ लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥ जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥ तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी झाली जीवे साटी ॥५॥