भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ

satyasankalpacha data narayan | sarva kari purna manorath

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥