भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यकर्म आचरें रे । बापा सत्यकर्म आचरें रे

satyakarma acharen re | bapa satyakarma acharen re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्यकर्म आचरें रे । बापा सत्यकर्म आचरें रे ॥१॥ सत्यकर्म आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥ ऊंस वाढवितां वाटली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी॥२॥ साकरेच्या आळां लाविला कांदा । सुळसानापरि वाढे दुर्गंधा ॥३॥ सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करीं ॥४॥