भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं

satya gururayen krupa maj keli | pari nahin ghadali seva kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥ भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥ कांय कळ उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥३॥ राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ॥४॥ बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥५॥ माहोशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥