भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा

sarvavishin ahmin he chi jodi keli | svimichi sadhili charanaseva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥ केली लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥ कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥ तुका म्हणे लाभ घेतला पालवीं। आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥