भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वपटी रुप समसारिखे आहे

sarvapati rup samasarikhe ahe

रचनाकार: संत सोपान · अभंग
सर्वपटी रुप समसारिखे आहे । म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।। निर्गुणी सगुण गुणामाजी गुण । जन तू संपूर्ण दिससी आम्हा ॥२॥ तेचि रुप रूपस दाविसी प्रकाश । पंढरीनिवास होऊनी ठासी ॥३॥ सोपान सलगी न बोलता उगा । तुजविण वाउगा ठाव नाही ॥४॥