भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली

sarvakal majhe chittin | he chi khanti rahili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥ तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥