भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा

saralin hin namen uchcharavin sada | hari ba govinda ramakrushna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । घेती भाव धरा एके ठायीं ॥२॥ सेळ्या मेंढएा गाई सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥ तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥