भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ

santan avade to kalacha hi kal | samarthachen bal jevin samartha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥ केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नाशा मूळ ॥२॥ तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥