भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी

sant gati harikirttanin | tyanchen ghein payavani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥ काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥ संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥